१३ ला इपिलेप्सी शिबीराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा   : 
आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान व डॉ. निर्मल सुर्या इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय भंडारा येथे १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजता इपिलेप्सी ( आकडी ) शिबीराचे  आयोजन करण्यात आले आहे.
 या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश संजय देशमुख  करणार असून प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी शांतनू गोयल, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपस्थित राहणार आहेत.
 सदर शिबीराचा हेतू इपिलेप्सीच्या रुग्णांची तपासणी, तज्ञांमार्फत त्यांचे योग्य निदान व मोफत उपचार हा आहे. शिबीरामध्ये बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये इपिलेप्सी व इतर न्युरोलॉजीकल आजार असलेल्या विद्यार्थ्यांना तज्ञांची संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर इपिलेप्सीच्या रुग्णांची सुध्दा तपासणी करण्यात येणार आहे. शिबीरात खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहे.
 रुग्णांची मुंबई येथून येणाऱ्या न्युरोलॉजीस्ट तर्फे तपासणी, रुग्णांची मोफत्‍ इ.इ.जी. चाचणी, रुग्णांना मोफत औषधी व उपचार, रुग्णांना समुपदेशन स्पीच थेरपी ऑक्युपेश्नल थेरपी, फीजीओथेरपी, इपिलेप्सी आजाराबाबत पथनाटय व प्रदर्शन  तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना व खाजगी व्यावसायिकांकरीता इपिलेप्सी सीएमई सेवा उपलब्ध होणार आहेत.
 नागरिकांनी या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-01-10


Related Photos