स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेअंतर्गत उद्या ‘रॉकेट तंत्रज्ञान आणि अंतराळ विज्ञान’ विषयावर परिसंवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. सदर व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ञ वक्ते / अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्याअनुषंगाने सातव्या सत्राचे ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे ‘रॉकेट तंत्रज्ञान आणि अंतराळ विज्ञान’ या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिसंवाद कार्यक्रमाकरीता मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अल्पीकेशन सेंटर नागपूर येथील वरिष्ठ वैज्ञानिक संजय बलमवार, वैज्ञानिक सदस्य अशोक मेडोपल्लीवार तसेच तांत्रिक सदस्य काम्या शुक्ला, प्रदिप शहारे, श्रीमती नम्रता फुलझेले व अक्षय करदवार हे उपस्थित राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी सदर परिसंवाद कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरीता इयत्ता ९ वी व १० वी मधील विज्ञान विषयात आवड असणाऱ्या दोन विद्यार्थी व विज्ञान विषय शिक्षक यांची नावे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे नोंदणी करण्यात यावी. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी कळविले आहे.



  Print






News - Gondia | Posted : 2019-01-10






Related Photos