महत्वाच्या बातम्या

 हिंगणा एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग : ३ कामगारांचा मृत्यू तर ३ कामगार गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव निपाणी येथे कटारिया ॲग्रो प्रा. लि. या कंपनीत भीषण आग लागल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आज २४ एप्रिलला सकाळच्या सुमारास सदर घटना घडली. 

सदर कंपनीत सेमीकंडक्टर बनविण्यात येतात. सकाळच्या सुमारास आग लागली तेव्हा कामगार काम करत होते. आगीमुळे काही जण आतच अडकले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या सुमारे ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आली आहे. दरम्यान, या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

आगीवर नियंत्रणात आणले असून जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत. 





  Print






News - Nagpur




Related Photos