धानाला वाढीव बोनस देण्यासाठी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री फडणवीस


-भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे, या जिल्हयातील शेतकऱ्याना विविध कारणांमुळे नुकसानीचा सामना करावा लागतो, अशा परिस्तिथीत अतिरिक्त बोनस त्यांच्या आर्थिक बाबीत मदतीचा ठरतो. म्हणून शासनाने धानाच्या बोनस रकमेत वाढ करावी, असा पाठपुरावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करून धानाला २०० ऐवजी ५०० रूपये प्रतिक्विंटल बोनस देण्याची मागणी केली. विनोद अग्रवाल यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला वाढीव बोनस देण्याबद्दल सकारात्मक असल्याचे सांगितले. या निर्णयानंतर शेतकऱ्याना वाढीव बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गोंदिया जिल्हयात धानाची शेती मोठया प्रमाणात केली जाते. जिल्हयात जवळपास २ लाख शेतकरी आहेत. मात्र अस्मानी संकट काळ वेळ बघून येत नाही त्याच्याचमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल हे सतत शासन दरबारी पाठपुरावा करीत असतात. शेतकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणींना वाचा फोडून मार्गी लावण्याचे काम सतत ते करत असतात. त्यानुरूप विनोद अग्रवाल यांनी शासनाने धानाच्या बोनस रकमेत वाढ करावी, अशी मागणी केली होती आणि वेळोवेळी त्याचा पाठपुरावा देखील केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धानाला वाढीव बोनस बद्दल सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. आणि निर्णयानंतर धानाला वाढीव बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर शेतकऱ्यांच्या समस्याची शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे विनोद अग्रवाल यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-01-10


Related Photos