महत्वाच्या बातम्या

 एमपीएससीचे एक लाखाहून अधिक हॉल तिकीट टेलिग्रामवर व्हायरल : एकाला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : एमपीएससीच्य हॉलतिकीट प्रकरणी डेटा लिकप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतून एकाला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेकायदारित्या माहिती प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा एमपीएससी 2023 A टेलिग्राम चॅनलचा तो ऍडिमन आहे.

एमपीएससीचे 1 लाखाहून अधिक हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हॉलतिकीट व्हायरल झाले तरी 30 तारखेलाच पेपर होणार असल्याचे स्पष्टीकरण एमपीएससीने दिले आहे. मात्र तारीख न बदलल्याने विद्यार्थी संतापले आहेत. 


हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्याने विद्यार्थी संतापले 

एमपीएससी अभ्यासक्रमावरुन काहीच महिन्यांपूर्वी विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यात आता 30 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आयोगाने विद्यार्थ्यांना देण्याआधीच टेलिग्रामवर व्हायरल झाले. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याने एमपीएससीची वेबसाईट हॅक झाल्याचा आरोप करण्यात आला. टेलिग्रामवर तब्बल एका लाखापेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमपीएससीचा पेपर सुद्धा हॅकरकडे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

गेल्या काही वर्षात एमपीएससी आणि वाद हे एक समीकरण बनलंय. काही महिन्यांपूर्वी एमपीएससी अभ्यासक्रमावरुन हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. त्यानंतर आता तर चक्क एमपीएससी परीक्षेची हॉलतिकिटे टेलिग्रामवर व्हायरल झाली आहे. परीक्षेचा पेपर व्हायरल तर झाला नाही ना याची भिती विद्यार्थ्यांना आहे. राज्य सेवा परीक्षांसाठी स्वतंत्र आयोग असताना इतका घोळ का होतो असा संतप्त सवाल विचारला जात आहे. 


- हॉल तिकीट व्हायरल प्रकरणात  MPSCचे स्पष्टीकरण काय? 

- प्रवेश प्रमाणपत्रं टेलिग्रामवर प्रसिद्ध झाले

- बाह्यलिंकद्वारे प्रवेशपत्र प्रमाणपत्र सुविधा बंद करण्यात आली

- हॉलतिकीट वगळता विद्यार्थ्यांचा इतर डेटा लीक झालेला नाही

- परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत असा दावा MPSC आयोगाकडून करण्यात आला आहे.

- पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचे MPSC आयोगाचे म्हणणे आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos