उद्योजकांनी डिसेंबर २०१८ अखेरचे ई-आर-१ विवरणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  / भंडारा :
शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना / औद्योगिक आस्थापना तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना सर्व प्रकारच्या रोजगारविषयक सेवा आता ऑनलाईन देण्यात येत आहे. त्यासाठी www.mahaswayam.in वेबपोर्टल कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई यांनी विकसित केले असून या पोर्टलवर सर्व रोजगारविषयकसेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-आर-१ विवरण पत्र सादर करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०१९ आहे.
तेव्हा सर्व आस्थापना / उद्योजक यांनी विहीत मुदतीत आपले विवरण पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करावे. प्रत्येक तिमाही नंतर ६० दिवसांच्या आत म्हणजेच डिसेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन भरुन देणे बंधनकारक आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. ऑनलाईन ई आर -१ सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी कळविले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-01-10


Related Photos