२० व्या पशुगणनेस प्रारंभ : ५९ प्रगणकाची नेमणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा   :
२० व्या पशुगणनेस प्रारंभ झाला असून त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती सदस्य दर्शन भोंदे यांच्या हस्ते शहापूर येथे करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच किरण भूरे, डॉ. नितीन फुके उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. सविता वाढई यांनी प्रास्तविकामध्ये पशुगणनेबाबत माहिती दिली. 
भंडारा तालुक्यात १३ प्रगणक असून त्यांना पशू गणनेचे क्षेत्र देण्यात आलेले आहेत. हे प्रगणक त्यांच्या क्षेत्रातील प्रतयेक गावात, प्रत्येक घरी, कार्यालय, मंदिर, संस्था येथे ज्यांच्याकडे जनावरे असतील किंवा नसतील त्यांचेकडे जावून माहिती घेवून शासनातर्फे पुरवठा केलेल्या टॉब मोबाईल मध्ये नोंदी घेणार आहेत. यात त्यांच्याकडे असलेले पाळीव पशुपक्षी यांच्या नोंदी घेणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी चंद्रप्रकाश दुरूगकर यांनी जनगणना करतांना गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना याचे महत्व सांगावे व पुशुगणना करुन घ्यावी. पशुगणना करतांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अडचणी आल्यास या भागातील सर्व पदाधिकारी मदत करतील, असे आश्वासन त्यांनी दिले. पशुगणनेकरीता सर्व नागरिकांनी पशुसंवर्धन विभागाच्या प्रगणकांना संपूर्ण खरी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, चंद्रप्रकाश दुरूगकर, दर्शन भोंदे, किरण भोंदे यांनी या प्रसंगी केले.
या प्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी जिल्हयात पशुगणनेकरीता ५९ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण भंडारा जिल्हयात पशुगणनेचे काम आजच सुरु करण्यात आले आहे. पशुपालक शेतकरी तसेच शहरातील नागरिकांकडे पशुबाबात व तसेच त्यांकडे असलेली कृषीबाबत जसे शेती व कृषि अवजारे याची माहिती सुध्दा संकलीत करावयाची असल्योन भंडाऱ्यातील जनतेला माहिती देण्याचे सांगितले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-01-10


Related Photos