कोयलारी गावा शेजारी बिबट्याचे दर्शन : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी :
तालुक्यातील कोयलारी परिसरात काही दिवसांपासून बिबटा चा वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली असून यावर  कोणतीही ठोस कारवाही करण्यात आली नाही . 
सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी गाव शेजारी असलेल्या तलावामध्ये बिबट आढळून आला.  या घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली. हि घटना  ७ जानेवारी रोजी सकाळी ६  वाजताच्या सुमारची आहे. घटनेची माहिती नागरिकांनी वनविभागाला कित्येकदा देऊनही ९ वाजता पर्यंत कोणतीच दाखल घेतली नाही. एवढी वेड लोटूनही एकही वनाधिकारी घटना ठिकाणी दाखल झाला नाही. त्यामुळे गावामध्ये रोष वक्त होत आहे. विशेष म्हणजे आढळून आलेल्या बिबट हा वन विभागाच्या कार्यालय १ किलोमीटर अंतरावर असून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं.  जिल्ह्यात वन्य प्राण्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अधूनमधून वन्यप्राण्यांचा शिकारीच्या घटना समोर येत असतात याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे .   Print


News - Gondia | Posted : 2019-01-10


Related Photos