भविष्याचे बलशाली नागरिक बना : विनीता साहू


-चाचा नेहरु बाल महोत्सव संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
हरण्याचे दु:ख बाळगु नका, चांगल्या सवयी ठेवा, मोठयांचा आदर करा, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा कारण बालवयात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्याच सवयी मोठेपणी कामी पडतात. प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा घेत तुमचं व्यक्तिमत्व मोठं करुन भविष्याचे बलशाली नागरिक बना, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी केले.
शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माहिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा माहिला व बाल विकास
अधिकारी विनोद डाबेराव, महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे, बाल विकास अधिकारी निपसे, बाल न्यास मंडळाचे सदस्य सानिका वडनेरकर, रविंद्र डोंगरे, विजय रोकडे, वैशाली सतदेवे उपस्थित होते. 
विनीता साहू पुढे म्हणाल्या की, लोकांना प्रेरणा मिळावी असे जीवन जगा, घरात व समाजात शांतता टिकली पाहिजे असे वर्तन ठेवा असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित बालकांना दिला. याप्रसंगी माहिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे यांनी संधी साधा व जिथे अडचणीवर मात करण्याची ताकद ठेवा, पराभव हा शेवटचा नसतोच त्यासाठी सदोदीत प्रयत्न फार गरजेचे असते. लहान वयातच त्या गोष्टी अंगी बाळगा, तुमचे वर्तन हे तुमच्या आयुष्याला दिशा व कलाटणी देणारे असते, त्यामुळे चांगल्या वर्तनातून चांगले व्यक्तीमत्व घडवा असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यानी आजपासून स्पर्धा परीक्षा व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मानस ठेवा, बाल महोत्सव हे तुमच्या व्यक्तिमत्वाला कलाटणी देणारे व जळण घडण करणारे एक व्यासपिठ आहे. या व्यासपिठातून चांगल्या गोष्टी सोबत घेऊन आपल्या पुढील भविष्यात त्याचा वापर करा, असे सांगितले. यावेळी बाल महोत्सव मध्ये विविध क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमाचे संचलन संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले तर आभार संरक्षण अधिकारी सुनिल माहुरे यांनी मानले. बाल महोत्सवाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा परिविक्षा अधिकारी ऐश्वर्या भोयर, अरुण बांदुरकर, बाल संरक्षण अधिकारी नितीन साठवणे, विधी सल्लागार सुवर्णा धानकुटे, वरिष्ठ लिपीक दिवाकर महाकाळकर, विलास भेंडारकर, प्रमोद गिऱ्हेपुंजे,अमित गजभिये, लेखापाल अजित नागोसे, समुपदेशक सरीता रहांगडाले, दिलीप रंगारी, संरक्षण अधिकारी चुन्नीलाल लोथे, सामाजिक कार्यकर्ता शिल्पा रंगारी, नामदेव भुरे, योगेश बारस्कर, विनोद भुते, निलय बेंदवार यांनी परिश्रम घेतले.  Print


News - Bhandara | Posted : 2019-01-10


Related Photos