सि.एफ. म्हणून कपात केलेला पैसा परत द्या : बालाजी सातपुते यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतीनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली वन बिटाअंतर्गत मौजा अजयपुर येथील कामगार सन २००८ पासून बिट कटाई आणि बांबू कटाईच्या प्लांटेशनच्या कामगार रोजंदारीसाठी नियमितपणे आजपर्यंत कामावर आहेत.
सदर कामगाराचा कामाचा मोबदला म्हणून मिळणाऱ्या वेतनातून काही पैसा सि. एफ. म्हणून कपात केल्या जाते. परंतु सि. एफ. म्हणून कपात केलेला पैसा आजपर्यंत त्या कामगारांना मिळालेला नाही. त्यामुळे कपात केलेला आजपर्यंतचा पैसा परत मिळावा, याकरिता मागणीसाठी कामगारांनी अनेकदा सबंधीत कार्यालयाकडे मागणी केली.
परंतु सदर मागणीकडे चिचपल्ली बिटाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अजयपुर येथील कामगारांचा सि. एफ. म्हणुन कपात केलेला आजपर्यंतचा पैसा त्यांना तातडीने देण्यात यावा, अशी मागणी अजयपुर येथील अन्यायग्रस्त कामगार आणि शिवसेना बल्लारपूर उपतालुका प्रमुख बालाजी सातपुते यांनी केली आहे.
News - Chandrapur