महत्वाच्या बातम्या

 भगवान गौतम बुध्द व डॉ. आंबेडकरांचा अहिंसेचा मार्ग स्विकारा : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आतंकवाद, हिंसाचार, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदि अनेक समस्यावर परिस्थितीनूसार तोडगा काढण्याचे आवाहन आज राष्ट्रासमोर आहे. समाजात किरकोळ गोष्टींचा व घटनांचा विकृत पध्दतीने प्रचार करून स्वार्थ साधकांची संख्या वाढत आहे. उपद्रवी लोकांना धडा शिकविण्यासाठी समाजाने एकत्रीत येण्याची गरज आहे. अहिंसेच्या मार्गनेच जगाला जिंकता येवू शकते कारण अहिंसेत प्रगतीचा मार्ग लपलेला आहे. भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अहिंसेचा मार्ग स्विकारा असे प्रतिपादन वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. ते 23 एप्रील रोजी ड्रीम लॅन्ड सिटी येथे जेतवन बुध्दीस्ट सोसायटी द्वारा आयोजीत स्नेहबंधन व सत्कार समारोह प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

यावेळी मंचावर एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, प्रदेश अध्यक्ष इंजिनिअर विजय नाखले, सामाजिक कार्यकर्ते राजु लभाने, सुप्रसिध्द समाजसेविका अॅड. अर्चना पेठे, सुजाता लोहकरे, जमीर खान, राजेश धोपटे, प्रा. प्रकाश हेंडवे आदि अनेक मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

आपल्या देशात सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता, बंधूभाव नेहमीच एकोपा - सलोख्याचे वातावरण राहीले आहे. वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पूनित झालेला आहे. येथे सर्वधम समभाव लोकांच्या मानसिकतेतून दिसून येतो, असे मत कॅप्टन मोहन गुजरकर यांनी व्यक्त केले. यावेळी इमरान राही, अॅड. अर्चना पेठे, सुजाता लोहकरे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सोसायटी तर्फे खासदार रामदास तडस यांचा शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भगवान गौतम बुध्द, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीमा भेट करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित विविध लहान मुलांचे स्पर्धेचे पारीतोषीक वितरण खासदार रामदास तडस यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना इंजिनिअर विजय नाखले यांनी, संचालन रिना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप बलवीर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सोसायटीच्या महीला वंदना नाखले, अंजली मडामे, समता हेंडवे, नलीनी कांबळे, अनिता गणवीर, वंदना बलवीर, सुरेखा कांबळे, रिना पाटील, शुभांगी किटे, पुष्पा मून, जयश्री वंजारी, करूणा काळबांडे, अजय मडामे, रवी पानबुडे, पुरूषोत्तम कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos