महत्वाच्या बातम्या

 वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनीबसचा टायर फुटल्याने अपघात : १५ जखमी आणि २ जण गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव येथील वऱ्हाड घेऊन सावली तालुक्यातील गेवरा येथील लग्न सोहळा आटोपल्यानंतर वऱ्हाड्यांना घेऊन गावाकडे येणाऱ्या मिनीबसचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाले. सदर घटना रविवारी २३ एप्रिल २०२३ ला दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास चिखलगावाजवळ घडली.

सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील वराकडील मंडळी सकाळीच गेवरा येथे पोहचली. लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर वन्हाड घेऊन मिनीबस दुपारच्या सुमारास एमएच १२ केक्यू ०९१९ क्रमांकाच्या मिनीबसने वऱ्हाडी गावाकडे निघाले. पळसगाव (चिखलगाव) जवळ गाडीचा मागील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले.

सदर अपघातात १५ वऱ्हाडी जखमी झाले आणि २ वऱ्हाडी गंभीर होते. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, अभिजित मुप्पीडवार यांनी आपले सहकारी आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. जखमी वऱ्हाडी हे सावरगाव, नांदगाव व चिखलगाव येथील असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच नागभीड, तळोधी बा. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos