महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात आज ०२ नव्या बाधितांची नोंद तर ०१ जण कोरोनामुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 312 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 02 असून कोरोनामुक्ताची संख्या 01 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38280 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37484 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 17 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 778 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.04 टक्के तर मृत्यू दर 2.04 टक्के झाला आहे. 

आज नविन बाधितामध्ये धानोरा तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्हयात आतापर्यंत 28 स्वाईन फ्ल्युच्या तपासण्यांपैकी 08 बाधित आढळून आले. सद्या सक्रीय स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्ण निरंक आहेत. स्वाईन फ्ल्यु मुक्त 06 झाले तसेच स्वाईन फ्ल्युने दोघांचा मृत्यू झाला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos