आरमोरी न. प. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात फूट पडून अपक्ष आघाडीचा उदय


-  विविध पक्षाच्या ४० कार्यकर्त्यांचा अपक्ष आघाडीमध्ये प्रवेश 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात फूट पडून अपक्ष आघाडीचा उदय झाला असल्याने या निवडणूकीला आता मोठी राजकीय कलाटणी मिळण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. शहरातील विविध पक्षाच्या ४० कार्यकर्त्यांनी अपक्ष आघाडीमध्ये प्रवेश केला आहे . याचा चांगलाच फटका मोठ्या पक्षांना बसणार आहे . 
अपक्ष आघाडीमध्ये विमल भांडेकर , लता दोहतरे , रंजना जुआरे , मंदा खापरे , वंशाला खापरे , रेखा खापरे , अनंदा बान्ते, उत्तरा बान्ते, माया चौके , कुसुम खापरे , निरुपा नारनवरे , कल्पना शास्त्रकार , महानंदा हजारे , शांता ढोक , ज्योती तितिरमारे , रंजू हजारे , विशाखा चौके , शोभा हजारे , मंगला मंगरे , यमुना चौके , उत्तरा हजारे , अपर्णा मेश्राम , विमल दहीकार ,प्रभा हजारे , वर्षा सावसाखरे , मीना मेश्राम , मंद कांबळे , मेटा हजारे , अनुबाई सावसागडे , ताराबाई मिराते, इंदिरा वाकडे , स्मिता सपाटे, शर्मिला मेश्राम , कल्पना तिजारे , नीलिमा वांगळे , पुष्पा धरत आदींनी प्रवेश केला . 
यावेळी सुरेंद्रसिंग चंदेल चंदू बेहरे , अविनाश गेडाम , छायाताई कुंभारे , श्रीरंग धकाते , चंद्रशेखर मने , शंकर सातव, अशोक माडावर , सुनंदा आतला, भूषण सातव , जयंत चाचारकार , सागर मने , कवडू सहारे , योगेश देविकार , लहानू पितारे , माणिक भोयर, इंदिरा श्रीरामे , शैलेश चिलाम्वर , अमित सुरपाम कल्पना तिजारे , स्वप्नील हेमके , भूषण किरमे , अक्षय चाचरकर , जयंत दहीकार आदी उपस्थित होते . यावेळी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-09


Related Photos