प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना संजिवनी ठरणार : खा. रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
भारतीय जनता पार्टीचे केन्द्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्याच्या प्रति जागरुक आहे. सर्व सामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केन्द्रसरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वीत केलेली आहे. या योजने अंतर्गत गरीब कुंटुबातील प्रत्येकाचे आरोग्य कवच तयार असून त्याव्दारे गंभीर आजारावर गरीब कुंटूबातील व्यक्तींना ५ लक्ष रुपयापंर्यत उपचार घेणे सोईचे झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये जिल्हयातील १ लाख २९ हजारपेक्षा जास्त कुंटुबाना आरोग्य कवच मिळालेले आहे. या योजनेतून आतापंर्यत १ हजार पेक्षा जास्त नागरिकांना फायदा झालेला आहे.  प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना हि शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना संजिवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी मुरदगांव बेलसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले.
 मुरदगांव बेलसरे ता. देवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच उद्घाटन सोहळा खा. रामदास तडस शुभ हस्ते व जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाणे,आरोग्य शिक्षण सभापती जयश्री सुनील गफाट, जि.प.सदस्य वैशाली जयंत येरावार, प.स.सभापती विद्या दशरथ भुजाडे, प.स.उपसभापती किशोर गव्हालकर, प.स.सदस्य कुसुम प्रभाकर चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, जयंत येरावार, माजी सभापती मिलिंद भेंडे,  मुरदगांव बेलसरे चे सरपंच चंदकांत ठाकरे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.
 खासदार तडस पुढे म्हणाले कि, मुरदंगाव बेलसरे सारख्या छोटया गावात देवळी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्र स्थानांतरीत झाल्याने या परीसरातील १८ गावे व जवळपास ३४ हजार नागरीकांना आरोग्याची सेवा उपभोगू शकनार आहे. या नवनिर्मीत प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता पुढील आर्थीक वर्षात सुसज्ज इमारत निर्माण करण्याकरिता 3 करोड रुपये निधी मिळवून देण्यास प्रयत्न करणार तसेच परिसरातील नागरिकांनी मुरदगाव बेलसरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळी केले.        
 यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाणे, आरोग्य शिक्षण सभापती जयश्री सुनील गफाट, जि.प.सदस्य वैशाली जयंत येरावार, प.स.सभापती विद्या दशरथ भुजाडे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.  
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंदकांत ठाकरे केले, संचालन हिवंज यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रवीण धवणे यांनी मानले, कार्यक्रमाकरिता मुरलीधर डहाके, संजय वानखेडे, रामदास टाळण, प्रमोद बोबडे, विजय बोतारे, पदमाकर मोकारकर, हनुमंत डहाके, प्रकाश ठाकरे, दितेश भोयर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.   



  Print






News - Wardha | Posted : 2019-01-09






Related Photos