महत्वाच्या बातम्या

 प्रकल्पग्रस्ताचे खोटे प्रमाणपत्र जोडून पोलिसात भरती झालेले युवक जेरबंद : गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


- बीड आणि नांदेडचे दिले दाखले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नावावर खोटे प्रमाणपत्र जोडून पोलिसांत भरती झालेल्या पाच ते सहा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले असून सरकार पक्षाकडून फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी एक आरोपी फरार असून पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहे.

माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गडचिरोली पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. यात सर्वसाधारण, एससी, एसटी, महिला, प्रकल्पग्रस्त, खेळाडू अशा कोट्यातून उमेदवार निवडले गेले. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या अंतिम छाननीच्या वेळी एका निनावी तक्रारदाराच्या तक्रारीवरून असता प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातील उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडल्याचे निष्पन्न झाले. 

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास सुरू केला. आरोपींना याची भनक लागताच ते दोन दिवसांपूर्वी फरार झाले. मात्र एलसीबीने शनिवारी यातील पाच ते सहा युवकांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनेला दुजोरा दिला असला तरी विस्तृत माहिती व आरोपींची नावे देण्यास नकार दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos