महत्वाच्या बातम्या

 खेलो इंडिया सेंटर आष्टीचे सुयश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : येथील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल कनिष्ठ तथा कला महाविद्यालयामध्ये खेलो इंडिया सेंटरच्या अंतर्गत धनुर्विद्या खेळाडूंनी क्रीडा व युवक खेल संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत अमरावती येथे नुसत्या संपन्न झालेल्या १९ वयोगटातील राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्यास्पर्धेमध्ये एकुण ०६ रौप्य व ०१ कास्यपदक असे एकूण ०७ पदक प्राप्त केले आहेत. त्यामध्ये खालील धनुर्विद्या खेळाडू चा समावेश आहे कुमारी निशा मिलन सरकार ०२ रौप्य पदक, कुमारी हिमांशी शंकर पुरमवार ०१ रौप्य पदक, कुमार आदित्य बंडू जुनघरे ०१ कांस्यपदक, कुमार जय योगपती वाकुडकर ०१ रौप्यपदक, कुमार स्मित संदीप जोरगलवार ०१ रौप्यपदक, कुमार गौरव संतोष कुसराम ०१ रौप्यपदक, पदक प्राप्त केले. या खेळाकरिता वनवैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष आदरणीय बबलूभैया हकीम तथा शाहीन भाभी हकीम यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल, सहाय्यक अधि.घनश्याम वरारकर, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल चे प्राचार्य शैलेंद्र खराती तसेच कला महाविद्यालयाचे प्राचार्य संजय फुलझेले यांच्या दिशा- निर्देशामुळे विद्यार्थ्यांना हे सुयश प्राप्त करता आले. सर्व विजयी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक श्याम कोरडे यांना दिले आहे. आदरणीय बबलू भैया तसेच शाहीन भाभी हकीम, प्राचार्य शैलेंद्र खराती प्राचार्य संजय फुलझेले, आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे साहेब पर्यवेक्षक के.जी. बैस, दिनकर  हिरादेवे, वरिष्ठ लिपिक राजू पोटवार, यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिले. या विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक सुशील अवसरमोल, सहायक नितेश डोके, कु. कौमुदी श्रीरामवार, अरविंद वनकर, कु. पूजा डोर्लीकर यांचेसुद्धा मार्गदर्शन लाभले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos