महत्वाच्या बातम्या

 विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या वाडीला आग : रत्नापूर येथील शेतातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील स्मशान भूमी जवळील शेतशिवारात आदर्श शेतकरी मारोती ढोणे यांचे शेत आहे. यांच्या शेतात ऊस लागवड  केलेल्या वाडीला सायंकाळच्या सुमारास विद्युत तारांच्या शार्ट सर्किटमुळे आग लागली आणि  त्यात १ एकर ऊसाची वाडी खाक झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

माहितीनुसार रत्नापूर येथील आदर्श शेतकरी मारोती ढोणे हे ऊस, धान, भाजीपाला, फळ झाडे लागवड करून आपला कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. मागील ४ दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट दररोज सायंकाळी पहावयास मिळते.

काल २२ एप्रिल २०२३ ला सायंकाळच्या वेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळ, विज-विजेची कड़कड़ात सुरु होती आणि विज जाणे-येणे करीत होती. त्यावेळी रत्नापुर येथील मारोती ढोणे यांच्या शेतात ऊसाच्या वाडीला विद्युत लाईनच्या तारांच्या शार्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. त्यातजवळ पास १ एकरात असलेल्या ऊस लागवडीला आग लागल्याने आगीत ऊसाची वाडी खाक झाली. त्यात या शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. यांचा रसवंतीचा व्यवसाय असून दररोज त्यांना उस लागत असतो. 

त्यामुळे या आगीमुळे त्यांच्या व्यवसायावर खुप मोठे सकंट कोसळले आहे. तरी मारोती ढोने या शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी  रत्नापुर येथील शेतकरी करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos