१० ला वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा यांचे अधिनस्त जिल्हयातील सर्व मागासवर्गीय मुलांमुलींचे शासकीय वसतीगृह व शासकीय निवासी शाळा यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक स्नेह संमेलन उडान २०१८ चे आयोजन १० ते १२ जानेवारी या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे करण्यात आले आहे.
१० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उदघाटन क्रीडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे राहणार आहेत. ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उदघाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य डी.एन. धारगावे राहणार आहेत.
कायदेविषयक मागदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश संजय देशमुख करणार असून मला उद्योजक व्हायचय…. या विषयावर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्य्क संचालक शैलेश भगत मार्गदर्शन करणार आहेत.
१२ जानेवारी रोजी सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता होणार आहे.  या कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गृहपाल व मुख्याध्यापक शासकीय निवासी शाळा यांनी केले आहे.
   Print


News - Bhandara | Posted : 2019-01-09


Related Photos