महत्वाच्या बातम्या

 जोगीसाखरा येथे शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ च्या प्रभावी अंमलबाजावणीच्या उद्देशाने व जिल्हा परिषद शाळांचा स्तर उंचावा यासाठी शासन विविध प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनातर्फे शाळापूर्व तयारी मेळावा हा उपक्रम घेण्यात येतो. या मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीमघ्ये दाखल होणाऱ्या मुलांची चाचणी घेतली जाते. चाचणीच्या निष्कर्षावरून शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती व लीडर माता यांच्या मदतीने ८ कृती कार्डाच्या माध्यमातून दाखलपात्र विद्यार्थ्यांना दोन महिने मार्गदर्शन दिले जाते व त्यानंतर तो विद्यार्थी सर्व आवश्यक क्षमता प्राप्त करून इयत्ता पहिलीमध्ये दाखल होतो. यासाठीच केंद्र शाळा जोगीसाखरा येथे  जोगीसाखरा केंद्राचे शाळा पूर्वतयारी  केंद्रस्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 

प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी बुल्ले मुख्याध्यापक जोगीसाखरा, जांभूळकर मुख्याध्यापक पळसगाव, आयोजक कैलाश टेंभुर्णे केंद्रप्रमुख जोगीसाखरा, सुनंदा गिरीपुंजे जिल्हा समन्वयक, अश्विनी गेडाम गट साधन केंद्र आरमोरी, प्रशिक्षक म्हणून सुनील पनकंटीवार मुख्याध्यापक शंकरनगर, संघमित्रा मेश्राम शिक्षिका पळसगाव  उपस्थित होते. 

सदर प्रशिक्षणाला केंद्रातील १० शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या व लीडर माता उपस्थित होत्या.

प्रशिक्षणात सुरुवातीला सुनंदा गिरीपुंजे गटसाधन केंद्र आरमोरी, तसेच सुनील पनकंटीवार, संघमित्रा मेश्राम प्रशिक्षक यांनी शाळापूर्व तयारी मेळाव्याची पार्श्वभूमी, मेळाव्याचे स्वरूप व फलनिष्पत्ती याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात उपस्थित शिक्षकांचे दोन गट तयार करण्यात आले. दोन्ही गटांनी नियोजित वेळेत नोंदणी, वजन व उंची, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी, समुपदेशन असे विविध दालने व प्रत्येक दालनाशी संबंधित शैक्षणिक साहित्य तयार केले. 

त्यानंतर काही शिक्षक विद्यार्थी बनून प्रत्यक्ष विद्यार्थी चाचणी कशी घ्यायची याचे प्रात्यक्षिक केले. सदर प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिक भागात शिक्षकच उस्फूर्तपणे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी अश्या विविध भूमिका वठवित होते. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. व्यवस्थापन समितीची सभा, गावात मुनारी देणे, क्षमता तपासणी, विद्यार्थी समुपदेशन इथपर्यंत प्रत्येक टप्पा योग्य पद्धतीने राबविण्यात आला.

सदर प्रत्यक्षिकात अत्यंत उस्फुर्तपणा जाणवला. बँड पथकाच्या उपस्थितीत दाखलपत्र मुलांना वाजतगाजत दालनापर्यंत आणण्यात आले. नोंदणी पासून गणनपूर्व तयारी पर्यंत प्रत्येक टप्पा सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यात आला. शिक्षकांनी सुद्धा लहान विद्यार्थी बनून या प्रशिक्षणाचा मनमुराद आनंद लुटला.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पदवीधर शिक्षक आनंदकुमार हेमके यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वामन उईके, केवळराम शेंडे, चंदू खोब्रागडे, गुरुदास लोणारे, शेंडे सालमारा, शिलार कनेरी, प्रदीप सिडाम, दुर्गादास कापकर, धनंजय गुळदे, शिक्षिका हर्षा पिलारे, मिना बांडेबूचे, मंदा देवाडे, रत्ना बडकेलवार यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos