१० ला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  : 
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन ग्राम विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंढी/जवाहर नगर येथे १० ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.
१० जानेवारी रोजी प्रदर्शनीचे उदघाटन खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री ॲड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, , मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शिवाजी वारघडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, समाज कल्याण सभापती रेखा वासनिक उपस्थित राहणार आहेत.
११ जानेवारी रोजी सकाळी १०. ३० ते सायंकाळी ५  वाजेपर्यंत विज्ञान प्रदर्शनचे परिक्षण व सर्वांसाठी खुले राहील. दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत विज्ञानावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होतील. १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता विज्ञान मेळावा- पाणी व्यवस्थापन शक्यता व पुढील मार्ग, सकाळी ९ ते ११ वाजता वादविवाद स्पर्धा, सकाळी १० ते १ वाजेपर्यंत विज्ञान प्रतिकृतीचे परिक्षण पाहण्यासाठी प्रदर्शनी सर्वांसाठी खुली राहील. दुपारी १२ ते १ वाजता प्रश्नमंजुषा. दुपारी २  वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विधान परिषद सदस्य नागोजी गाणार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य परिणय फुके, ले. कर्नल अभिजीत वैद्य, बांधकाम सभापती प्रेमदास वनवे उपस्थित राहणार आहेत.
   Print


News - Bhandara | Posted : 2019-01-09


Related Photos