१० ला जिल्हास्तरीय अपंग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा  :
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण समिती जिल्हा परिषद भंडाराचे विद्यमाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांचे अधिनस्त कार्यरत शासकीय अनुदानित, विना अनुदानित व कायम विना अनुदानित अपंग शाळा, कर्मशाळातील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय अपंग क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा १० व ११ जानेवारी २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेचे उदघाटन खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री ॲड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र
जगताप जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, आरोगय सभापती प्रेमदास वनवे, महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी. सपाटे, माहिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे उपस्थित राहणार आहेत.
१० जानेवारी रोजी सकाळी १०. ३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत क्रिडा स्पर्धा व सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे होतील. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुपारी ३ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, समाज कल्याण सभापती रेखा वासनिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी. सपाटे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी वो. म. जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दौदल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण सभापती रेखा वासनिक व जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे यांनी केले आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-01-09


Related Photos