महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२३ एप्रिल महत्वाच्या घटना

१६३५ : अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

१८१८ : इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

१९९० : नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९९५ : जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

२००५ : मी ॲट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

२३ एप्रिल जन्म

१५६४ : इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म. (निधन: २३ एप्रिल १६१६)

१७९१ : अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)

१८५८ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७)

१८५८ : समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

१८७३ : अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

१८९७ : नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)

१९३८ : शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.

१९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

२३ एप्रिल मृत्यू

१६१६ : इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

१८५० : काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १७७०)

१९२६ : ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १८५४)

१९५८ : निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८७१)

१९६८ : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९०२)

१९८६ : इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

१९९२ : ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२१)

१९९७ : इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१८)

२००० : ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.

२००१ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)

२००७ : रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)

२०१३ : पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९१९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos