ग्राम कुडवा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन


- विकासाच्या पोकळ बोंबा मारण्याऐवजी भाजपचे विकास कामांना महत्व : आमदार परिणय फुके
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपचे पुढारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत, या अनुषंगाने गेल्या ४ वर्षात शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विकास कामे होत आहेत. त्याचेच फलित म्हणून आज ग्राम कुडवा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र भाजपने कधीही विकासाचे सोंग केले नाही. किंबहुना विकासाच्या पोकळ बोंबा सुद्धा मारल्या नाहीत, तर फक्त प्रत्यक्षात येणाऱ्या विकास कामांनाच महत्व दिले, गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या बोंबा मारणाऱ्यांची काही कमी दिसून येत नाही, असाही टोला आमदार परिणय फुके यांनी विरोधकांना लगावला.
ग्राम कुडवा येथे २५/१५ योजने अंतर्गत विविध विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी भूमिपूजक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडवा च्या सरपंच श्यामदेवी संजू ठाकरे ह्या होत्या. तर भूमिपूजक म्हणून आमदार परिणय फुके व तर दिप प्रज्वलक म्हणून माजी जि.प.उपाध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
 कार्यक्रमाला भाउराव उके, छत्रपाल तुरकर, शिव शर्मा, लिमेंद्र बिसेन, मुजीब पठाण, नरेंद्र तुरकर, कुणाल बिसेन, प्रभाकर ढोमणे, प्रदिप ठाकरे, लक्ष्मीचंद चौधरी, रमेश, युगलकिशोर ठाकरे, ओमप्रकाश हरीणखेडे, शितल पटले, नरेश पटले, प्रतिमाबाई, सुनिल जगनित, रेखाबाई बिसेन, निर्मलाबाई आगडे, शोभेलाल पारधी, रेषमा दिहारी, सतीष तिगारे, विनोद तिगारे, अमित वंजारी, शालिकराम कटरे, रूपलाल रहांगडाले, नरेश टेंभरे, नरेश पटले, भोजराज ठाकरे, शंकर मेश्राम, बालन बिसेन, डुमेंद्र बिसेन, विनोद बिसेन आदिं सह मोठ्या संख्येत गावकरी बांधव उपस्थित होते.
आमदार फुके पुढे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार मागील 4 वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला प्राथमिकता देत विविध योजना व विकास कामे घडवून आणत आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत .जेे काम गेल्या ७० वर्षात कधीही झाले नाही ते भाजप सरकारच्या माध्यमातून मागील ४ वर्षापासून सातत्याने केले जात आहे. यावेळी विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांपर्यत लोकोपयोगी योजना पोहोचविण्याचे काम आपण करीत आहोत, योजनांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांनी व्यक्तीगत व समाजाचा विकास साधावा, विशेष म्हणजे खोट्या विकासाच्या बाता करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना बळी न पडता, विकास करणारया व्यक्तींच्या पाठीशी नागरिकांनी खंबीरपणे उभे रहावे, अशी विनंतीही त्यांनी केली.  Print


News - Gondia | Posted : 2019-01-09


Related Photos