महत्वाच्या बातम्या

 आष्टी : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने येणापूर येथील घर कोसळले, म्हैस ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : आष्टी परिसरात 21 एप्रिल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उभ्या मक्याचे पीक खाली पडले यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे व पाऊसामुळे येनापुर येथील केशव बोडावार यांचे घर कोसळले यात या घरासमोर बांधून असलेली बापन्ना जक्कुलवार यांची म्हैस ठार झाली व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी आष्टी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच येणापुर येथील घराचे नुकसान झालेल्या मालकास व म्हैस ठार झालेल्या मालकांना त्वरित भरपाई देण्यात यावी अशी मागणी गोलकर समाज तालुकाध्यक्ष शामराव जक्कुलवार, यांनी केली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते मयूर बंडावार, पोलिस पाटील लोभा गेडाम, प्रदीप जक्कुलवार, रमेश जक्कुलवार, मोहन बंडावार, दिलीप गुंतीवार, डॉ. पेंदे आश्विन बंडावार हे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos