यापुढे कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा


-  महावितरणचे आवाहन 
- ११ जानेवारी  रोजी महावितरण तर्फे शिबीर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी : 
 ३ जानेवारी  रोजी राज्याचे  ऊर्जामंत्री  ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती. त्यात महाराष्ट्रातील महावितरणामधील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी यानंतर सर्वच कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे. 
ना.  चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार तालुकास्तरावर महावितरणतर्फे एकदिवशीय शिबीर आयोजित करण्याचे ठरविले आहे. हे शिबीर  ११ जानेवारी  रोजी महावितरणच्या आलापल्ली,सिरोंचा,भामरागड,एटापल्ली, चामोर्शी व सिरोंचा वनविभागीय कार्यालयात येथे घेणार आहे . याचा फायदा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी  घ्यावा . ज्यांचाकडे  शेततळे ,विहीर,बोरवेल,व इतर पाण्याची साधने आहेत व ज्यांना यापुढे कृषिपंपांना वीजपुरवठा घ्यायचा आहे अशा सर्वच शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा , जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रासहित या शिबिरात भाग घ्यावा व या सरकारी योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.  या योजनेची प्रसिद्धी करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांना सुध्दा महावितरच्या उपविभागीय कार्यालयातर्फे कळविण्यात येणार आहे.       Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-09


Related Photos