महत्वाच्या बातम्या

 हातपाय बांधून गळा चिरून हत्या



-प्रॉपर्टी वरून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रॉपर्टी वरून विवाद होऊन मुली ने आपल्या मावश्याचा हात पाय बांधून गळा कापून हत्या केल्याची खडबजनक घटना उघडकीस आले.

शहरातील महाराणा प्रताप वार्ड दुर्गा माता मंदिर जवळ सासरा शामराव कोडुरवार यांच्या मृत्यू नंतर घराचा प्रॉपर्टी करीता नेहमी वाद होत असे. शामराव कोडुरवार यांना तीन मुली आहेत. त्यात दुसऱ्या नंबर चा जावई विशाल दासरवर वय ४३ वर्ष हा नेहमी दारू पिऊन सासू व नातेवाईक सोबत वाद व्हायचे. त्यात २१ एप्रिल ला रात्री नेहमी प्रमाणे वाद झाले. त्यात विशाल दासरवार याचे हात पाय बांधून विशाल याच्या पत्नी ची बहिनलेक आरोपी नामे शिवानी अजय बोधनवार वय २४ वर्ष हिने ब्लेड ने गळा कापून हत्या केली.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी भेट दिले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास उमेश पाटील पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos