'रेडू' नंतर आता 'रापण'


- दिग्दर्शक सागर वंजारीचा नवा चित्रपट, सोशल मीडियाद्वारे मोशन पोस्टर लाँच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई :
  रेडू या पहिल्याच चित्रपटातून समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक सागर वंजारीनं नववर्षाच्या मुहुर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली. रापण असं या चित्रपटाचं नाव असून, सागरनं १ जानेवारीला सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच केलं. 
रापण या फेसबुक पेजवरून लाँच करण्यात आलेल्या या पोस्टरमधून समुद्राच जाळं असलेली एक होडी दिसते आणि रापण हे नाव येतं. अत्यंत नयनरम्य आणि विहंगम असं हे मोशन पोस्टर आहे. या मोशन पोस्टरमुळे आता या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं लेखन केल्याचं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे.
रेडू या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये मानसन्मान प्राप्त झाले होते. सागरला प्रतिष्ठेच्या अरविंदन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. स्वाभाविकच सागरच्या नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांचेही लक्ष आहे. 
'रेडू' या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर नव्या चित्रपटाचं काम सुरू झालं आहे. रापण असं या चित्रपटाचं नाव आहे. बाकी चित्रपटाची कथा, कलाकार हे सर्व तपशील योग्य वेळी जाहीर करण्यात येतील. मात्र, रापणच्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मांडला जाणार आहे,' असं सागरनं सांगितलं.   Print


News - Rajy | Posted : 2019-01-09


Related Photos