२०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या अन्यथा जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठवेल : राम नेवले


-    विदर्भ निर्माण यात्रा गडचिरोलीत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
आम्ही सत्तेत आल्यावर   स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू असे आश्वासन देत २०१४ च्या निवडणुकीत भाजप पक्ष  सत्तेवर आला.  विदर्भासाठी  आंदोलन केले ,  निवडणुकीत विदर्भाचे वचन दिले ,  विदर्भ देऊ म्हणून लेखी लिहून दिले .   विदर्भाच्या  नावावर निवडणुक लढविले ,  विदर्भाच्या नावावर ४४ आमदार निवडूनं आले. विदर्भातील ४४ आमदारांच्या बळावर महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. वैदर्भीय जनतेने  अभिवचनाला  बळी  पडून प्रामाणिकपणे साथ  दिली. परंतु साडे  चार वर्ष झाले  सरकार विदर्भाबाबत  बोलत नाही. मौनीबाबा झाले आहेत. मात्र यापुढे हे चालणार नाही २०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या अन्यथा विदर्भाची जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठवेल असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक  राम नेवले यांनी दिला आहे. 
यावेळी पत्रकार परिषदेला प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण पाटील मुनघाटे ,  देविदास लांजेवार, माजी मंत्री रमेश  गजबे, अरुण केदार , समय्या पसुला, देवराव दूधबळे  , गुलाबराव धांडे , मुकेश मासूरकर, मनीषा सज्जनपवार, गोवर्धन पवार, एजाज शेख , कौशिक आष्टीकर, विनोद भंडारे, राजू जक्कनवर आदी उपस्थित होते. 
२ जानेवारी रोजी सुरु झालेली  विदर्भ निर्माण यात्रा आज ८ जानेवारी रोजी गडचिरोलीत दाखल झाली. याप्रसंगी नेवले बोलत होते. ते म्हणाले,  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  अमित शहा म्हणतात '' विदर्भ आमच्या  अजेंड्यावर नाही ,तुम्ही वैदर्भीय जनतेची  साफ फसवणूक केली आहे. विश्वासघात केला आहे , विदर्भातील दोन्ही मोठे नेते  अमित शहा व नरेंद्र मोदींना विदर्भ राज्याबाबत  बोलण्याची हिम्मत करीत नाही.  असे पहिल्यांदा वैदर्भीय जनतेने बघितले आहे. 
 पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येऊन मागे अखंड महाराष्ट्राचा मुंबईचा  ठराव विधान सभेत मांडला  होता . विदर्भाचा विरोध केला होता ,विदर्भाचा विरोध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शत्रुत्व विसरून एकत्र येतात . परंतु विदर्भातील लाचार नेते  मात्र विदर्भाचे अभिवचन  दिल्यावर सुद्धा  विदर्भाबाबत बोलती बंद होते. असे लाचार व वैदर्भीय जनतेशी बेईमान करणाऱ्या नेत्यांना व पक्षाला मात्र या निवडणुकीत वैदर्भीय जनता नाकारणार आहे . पाच राज्यामध्ये जसे जनतेने या ''आश्वासन पक्षाला'' धडा शिकवलं तसाच विदर्भातूनही यांचा सफाया होणार आहे , असे नेवले यांनी म्हटले आहे. 
  तुम्ही काबुल केल्याप्रमाने २०१९ च्या निवडणुकी अगोदर विदर्भ राज्य द्या अन्यथा विदर्भातून चालते व्हा ,खुर्च्या खाली करा ,विदर्भातील जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठविल्याशिवाय राहणार नाही.  असा इशारा  विदर्भ राज्य आंदोलन समितीने  भाजपा सरकारला दिला आहे.  यासाठी विदर्भात जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे २ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत संपूर्ण विदर्भात  दोन यात्रा एक पूर्व विदर्भात तर दुसरी पश्चिम विदर्भात फिरून १०० लहान मोठ्या जनसभा घेणार आहे.   समारोपीय सभेला १२ जानेवारीला '' विदर्भ निर्माण महामंचा'' चे सर्व घटक पक्ष व संघटनेचे नेते उपस्थित राहतील . विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व नेते ,विदर्भ राज्य आघाडीचे नेते ऍड. श्रीहरी अणे , प्रहार शक्तीचे आमदार बचू  कडू , बी. आर. एस . पी . चे सुरेश माने ,आम आदमी पार्टी चे ब्रिगेडिअर सुधीर सावंत ,देवेंद्र वानखेडे (विदर्भ अध्यक्ष ),विदर्भ माझा चे राजकुमार तिरपुडे ,रिपब्लिकन पार्टी चे उपेंद्र शेंडे ,अहमद कादर ,जनसुराज्य पार्टी चे राजेश काकडे ,जांबुवंतराव धोटे ,विचार मंचचे सुनील चोखारे आदी नेते उपस्थित राहतील.   

 

 

 

 


      Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-08


Related Photos