महत्वाच्या बातम्या

 जिल्हा कोषागार अधिकारी वडेट्टीवार राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने सन्मानित


-  मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूरने सौर ऊर्जा व वॉटर हार्वेस्टिंग पर्यावरणपूरक प्रणालीसह पर्याप्त संसाधनांचा उत्तम वापर केल्याने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत कोषागार कार्यालय राज्यातून तृतीय पुरस्कारास पात्र ठरले. शुक्रवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार लाखांचा पुरस्कार देवून जिल्हा कोषागार अधिकारी प्रफुल वडेट्टीवार यांना सन्मानित करण्यात आले.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेसाठी राज्यस्तरावर प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. या प्रस्तावांची छाननी करुन अंतिम निवडीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली. राज्य स्तरावर एकूण 12 पुरस्कार व सर्वोत्कृष्ठ कल्पना उपक्रम सुचविणाऱ्या प्रशाकीय संस्था अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रथम तीन क्रमांचे पुरस्कार देण्यात आले. प्रशासकीय गतिमानता अंतर्गत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 10 लाख (जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय), 6 लाख (मुंबई शहर जिल्हाधिकारी) आणि चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयाला तृतीय क्रमांकाचा 4 लाखांचा पुरस्कार जाहिर करण्यात आला.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेसाठी लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तक्रारमुक्त कार्यालय, नावीन्यपुर्ण व पथदर्शी स्वरुपाच्या संकल्पना प्रयोग व उपक्रम अशा सात बाबींचा विचार होतो. चंद्रपूर कोषागार कार्यालयाने संसाधनाचा पर्याप्त व प्रभावी वापर श्रेणीत राज्यातून बाजी मारली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos