महत्वाच्या बातम्या

 मुल पोलीसांनी गुरे वाहुन नेणाऱ्या दोन ट्रक मधील ५० गोवंशिय जनावरांची सुटका करून एका आरोपीस केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशान्वये २० एप्रिल २०२३ रोजी ऑल ऑऊट ऑपरेशन मोहिम दरम्यान गांधी चौक मुल येथे नाकाबंदी करीत असता सावली वरुन मुल कडे दोन ट्रक मध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतुक करीत असल्याबाबत गुप्त माहिती पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांना मिळाल्याने त्यांनी गांधी चौक मुल येथे रात्रौ ०३:०० वाजता दरम्यान पंचासह नाकेबंदी करीत असता (१) ट्रक क्रमांक एपी २९- टीबी-३५१९ या ट्रकला थांबवून त्याची पाहणी केली.  

सदर ट्रकच्या मागल्या डालयामध्ये लहान मोठे २४ नग बैल किंमत ३ लाख २० हजार रुपये (२) ट्रक क्रमांक एपी २० वाय ९४५५ चे मागच्या डाल्यामध्ये लहान मोठे २६ नग बैल किंमत ३ लाख ६० हजार रुपयाचे अवैधरित्या निर्दयतेने वाहतुक करुन घेवुन जात असतांना मिळुन आले व वाहतुकी करीता वापरण्यात आलेले दोन्ही ट्रक किं. १० लाख असा एकुण १६ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल नेत असता मिळुन आल्याने आरोपी (१) प्रशांत बाळा जुमनाके (२८) रा. गडचांदुर, (२) मोहम्मद अली अजगर अली सैयद, (२) किस्मत अली मो. अली सैयद दोन्ही रा. टेकाडी यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक १५५ / २०२३ कलम ५, ५ (अ), ५ ( ब ), ९ महाराष्ट्र प्राणी सुधारीत अधिनियम १९७६ सहकलम ११, (१) (ड) प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस करिना बंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीका अर्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, सपोनि सतिश बनसोड, सफौ उत्तम कुमरे, पोहवा पुंडलिक परचाके, नापोअ सचिन सायंकार, सुनिल घोडमारे, पोअं गजानन तुरेकर, चालक पोअं स्वप्नील यांनी केली असुन पुढील तपास सपोनि सतिश बनसोड करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos