महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : प्रोजेक्ट उडाण अंतर्गत अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प संपन्न


- गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 

- सगर कॅम्प मधुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : अपर पो. अधी. कुमार चिंता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून दुर्गम-अतिदुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक बौद्धीक विकास व्हावा, त्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मनोरंजनात्मक बाबींचा आनंद घेता यावा या उद्देशाने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या विविध आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली याच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या समर शिबीराचे आयोजन १५ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत करण्यात आले होते व आज २० एप्रिल २०२३ रोजी त्याचा समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय, गडचिरोली याठिकाणी पार पडला.

झालेल्या समारोपीय कार्यक्रमामध्ये समर शिबीराकरीता सहभाग घेतलेले ८० विद्यार्थी तसेच त्यांच्यासोबत कवायत निर्देशक, योगा शिक्षक हे देखिल उपस्थित होते. त्यांना संबोधीत करतांना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) यांनी सांगीतले की, आपण आपले ध्येय उच्च ठेवावे व ते माठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून आपल्या आई-वडीलांचे नाव आपल्यामुळे समाजात मोठे होईल यासाठी प्रयत्न करावे, अशा प्रकारे त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या आयोजित केलेल्या दुसऱ्या शिबीरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी योगा ट्रैकिंग, स्विमींग, खेळाचा आनंद घेतला तसेच व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील वीसापूर येथील सैनिकी विद्यालय बॉटनिकल गार्डन, लाकडी डेपो, भद्रावती येथील विजासन टेकडी, ताडोबा जंगल सफारी, बटरफ्लाय गार्डन, तसेच त्यानंतर नागपूर येथील दीक्षाभूमी, रमन विज्ञान केंद्र व इतर विविध ठिकाणांना भेटी दिल्या.

गडचिरोली पोलीस दल व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या माध्यमातून एकूण ०५ टप्यांमध्ये ४०० विद्यार्थी-विद्यार्थीनीसाठी सदरचे शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. यातील पहीला टप्पा ८० विद्यार्थीनींच्या सहभागाने २० फेब्रुवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पार पडला होता. यावेळी आयोजीत दुसऱ्या टप्यामध्ये एकुण ८० विद्यार्थ्याचा सहभाग होता. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख, तसेच सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली सुधाकार गौरकार हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभागातील सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos