वर्धा पालिकेच्या मुख्याधिकारी वाघमळे यांच्याकडून कंत्राटदाराची कानऊघाडणी


- न्यायालय परिसरासमोरील नम्मा टॉयलेटची पाहणी दरम्यान  चढला मुख्याधिकाऱ्यांचा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
  शहराची स्वच्छतेकडे वाटचाल सुरु असतानाच शहरात सुमारे पाच  ठिकाणी उभारण्यात आलेल्या नम्मा टॉयलेटची मात्र, दुर्दशा झालेली आहे. सुमारे १५ लाख रुपये खर्चून निर्माण केलेल्या टॉयलेटच्या साफसफाईची मात्र, कोणालाही काळजी नाही. न्यायालयासमोर असलेल्या नम्मा टॉयलेटची पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी अचानक पाहणी केली असता टॉयलेट परिसरात असलेला कचरा पाहून ‘मॅडम’चा पारा चांगलाच चढला.मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित कंत्राटदाराला बोलावून तुम्हाला पटत असेल तर काम करा अन्यथा मोकळे व्हा, असे म्हणून चांगलीच कानऊघाडणी केली. शहरात सुमारे पाच ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून नम्मा टॉयलेट उभारण्यात आले आहे. 
एका नम्मा टॉयलेटची किमत सुमारे १५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. पण, खरच या टॉयलेटची साफसफाई होते का? हा मात्र प्रश्न पडतो. नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी अचानक न्यायालय परिसरासमोर असलेल्या नम्मा टॉयलेटची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांना नम्मा  टॉयलेटमध्ये कचरा तसेच दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. शहरात उभारण्यात आलेल्या नम्मा टॉयलेटची साफसफाई करण्याचा  कत्राट देण्यात आला आहे.
न्यायालयासमोरील नम्मा टॉयलेटची दुर्दशा पाहून मुख्याधिकारी वाघमळे  चांगल्याच संतापल्या त्यांनी तत्काळ संबंधित कत्राटदाराला तेथे फोन
करून बोलावले आणि कत्राटदाराला चांगले खडसावले. जर तुमच्याकडून नम्मा टॉयलेटची साफसफाई नसेल होत तर मोकळे व्हा, असे म्हणत  कत्राटदाराची चांगलीच कानऊघाडणी केली. आजुबाजूच्या व्यावसायीकांनाही चांगलेच खडसावले.
ज्या दुकानमालकांचा कचरा त्यांच्या दुकानासमोर होता.  त्यांनाही कचरा उचण्यास सांगितले. सुमारे १५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नम्मा
टॉयलेटच्या साफसफाईची जबाबदारी पालिकेकडे असताना हा खर्च केवळ पाण्यात तर गेला नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरात उभारण्यात आलेल्या पाच नम्मा टॉयलेटची जबाबदारी रामभरोसे असून याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-01-08


Related Photos