सार्वजनिक सेवेतील वाहनांना आता लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
  केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 125 (एच) नव्याने दाखल झाला आहे.  या अधिसूचनेनुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांची व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे 1 जानेवारी 2019 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. 
केंद्र शासनाने सदर अधिसुचनेनुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांची व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन बसविणे आवश्यक केले असून, त्यामधून दुचाकी वाहने. ई-रिक्षा, तीनचाकी वाहने व ज्या वाहनांना परवाना लागू नाही अशी वाहने वगळण्यात आलेली आहे.  विषयांकित सुधारणेनुसार बसविणाऱ्या उपकरणांचा तपशील आयएस:140:2016 या मानकानुसार व नंतर लागू होणाऱ्या बीएसआय मानकानुसार असून सदर उपकरण बसविणे उत्पादक, विक्रेता व संबंधित चालनकर्ता, ऑपरेटर यांना बंधनकारक आहे.  अधिसूचनेची अंमलबजावणी   01 जानेवारी 2019 पासून करण्यात आली आहे.
 तरी जानेवारी 2019 पासून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी वाहने व ज्या वाहनांना परवाना लागू नाही अशा वाहनाव्यतिरिक्त नवीन नोंदणी होणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा (पब्लिक सर्व्हिस) वाहनांमध्ये विहीत मानकानुसार लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इमर्जन्सी  बटन बसवल्याची खात्री करून मगच पुढील कामकाज करण्यात येईल याबाबत सर्व वाहन उत्पादक, वाहन विक्रेते व वाहन धाकर यांनी नोंद घ्यावी, असे आवहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपुर (शहर) यांनी केले आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-07


Related Photos