पोलिस विभागातर्फे आत्मसमर्पितांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र पोलीस दिनाच्या स्थापना दिनानिमित्त ‘रेझिंग डे’ च्या माध्यमातुन विविध कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलासमोर आजपर्यंत एकुण ६१३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या नक्षल्यांसाठी आज रोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
  नक्षल्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाच्या  विविध योजना मार्फतीने गडचिरोली पोलीस दल मदत करत असते. विविध योजनांच्या माध्यमातुन आत्मसमर्पितांना घरकुल, कृषी उदयोग साहीत्य, शिलाई मशिन  इत्यादीचे वाटप करण्यात येते. आज  आत्मसमर्पिंत नक्षल्यांना इतर विभागांच्या योजना यांची माहिती व्हावी व त्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे ‘ रोजगार मार्गदर्शन मेळावा ’ आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यास मार्गदर्शक म्हणुन मत्सव्यवसाय  आयुक्त  प्रशांत  वैद्य , कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे , उप विभागीय कृषी अधिकारी  प्रिती हिवरकर,  आणि आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे गौरकर,     उपस्थित होते. यावेळी त्यांनी आत्मसमर्पितांना शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येईल याबाबत अंत्यत सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी   पोलीस अधीक्षक  शैलेश बलकवडे   यांनी आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधुन त्यांच्या अडी-अडचणी समजुन घेतल्या व नक्षल्यांनी विकासाच्या दिशेने पाऊल उचलले याबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन सर्वांच्या कल्याणासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच आपल्या पाठीशी आहे. असे आश्वासन दिले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) डाॅ. हरी बालाजी,   अपर पोलीस अधीक्षक (नक्षल) डाॅ. मोहीत गर्ग आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उप निरीक्षक विनायक सपाटे व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-07


Related Photos