महत्वाच्या बातम्या

 कोरची तालुक्यातील बहुतेक विहिरी झाल्या कोरड्या : नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी भटकंती


- काही वर्षापासून सतत पाण्याची पातळी जात आहे खाली

विदर्भ   न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : नुकतीच काही दिवसापूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागली असून आतापासूनच तालुक्यातील बहुतेक विहिरी कोरड्या पडल्या असून यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती तर करावी लागत आहे परंतु येणारे भविष्य किती धोक्याचे आहे हे सुद्धा यामुळे दिसून येत आहे. कारण अजूनही उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असताना सुद्धा एवढ्या विहिरी कोरडे पडणे हे धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षापासून निरंतर पाण्याची पातळी ही खाली जात असून याचे काही मुख्य कारण असल्यामुळे याकडे आत्ताच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज झालेली आहे.

जसे काही वर्षापूर्वी पाण्याचा उपसा कमी प्रमाणात होता कारण पूर्वी पाणी काढण्यासाठी विहिरीतून दोर बादलीने पाणी काढणे, बोरमधून पाणी हापसणे, रहाटगाड्याने पाणी काढणे यासारखे मार्ग उपलब्ध असल्याने पाणी हे उपयोगी पुरतीच काढले जात होते. तसेच विहिरी व हातपम्प सुद्धा गावात मोजक्याच होत्या परंतु आता मोटार च्या साह्याने पाणी काढत असल्यामुळे बहुतेक वेळा मोटर ही सतत सुरू ठेवून पाण्याचा अपव्यव केला जातो. घरोघरी नळाचे साधन झाले असून यामुळे बहुतेक नळ हे सुरूच असते, बहुतेक वेळा नळाखाली भांडे ठेवून नळ  सुरू ठेवून बाकीचे कामे केली जातात त्यामुळे सुद्धा पाणी वाया जात असल्याचे दिसून येते.

झाडे लावा झाडे जगवा असे नेहमी बोलले जाते कारण झाडे हे वाहत्या पाण्याला अडथळा करतात पण अति वृक्षतोडीमुळे वाहत्या पाण्याला येणारा अडथळा दूर झालेला असल्यामुळे पाणी सुसाट पणे वाहत जाते व त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. आजच्या घडीला घरोघरी आंगनामध्ये फरशी, पेवर ब्लॉकमुळे व जागोजागी झालेल्या सिमेंट रस्त्यामुळे सुद्धा पाणीला जमिनीखाली मुरण्यास जागा मिळत नसल्यामुळे बहुतेक पाणी हे वाहून जात असल्याचे दिसून येते.

काही वर्षांपूर्वी पर्यंत कोरची तालुक्यात दुहेरी फसल लावण्याचे प्रमाण हे बोटावर मोजणे इतके होते परंतु तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आज दुहेरी फसल लावणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ झाली असून हे सुद्धा पाण्याची पातळी खाली जाण्याचे कारण आहे.

पाणी हे जीवनातील मुख्य साधनापैकी एक असून भविष्यात जर पाण्याची पातळी वाढवायची असेल तर त्याकरिता आत्मचिंतन करून उपाययोजना करणे गरजेचे जसे. जसे प्रत्येकाने पाण्याची अपव्यय टाळावे, भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येकानी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रक्रिया आपापल्या घरात करावी, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेले नळ हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून बंद करावे, पाईपलाईन फुटणे किंवा नळ तुटल्यामुळे पाण्याच्या अपव्यय होत असेल तर संबंधित विभागाला तातडीने सूचित करावे जेणेकरून येणाऱ्या भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही व येणाऱ्या पिढीला याचे बोध मिळेल हेही तितकेच खरे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos