नव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पाथरी :
सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या एका वर्षाच्या कालावधीत अवैध दारूचे ११५  गुन्हे उघडकीस आणले आहेत. नुकतेच नवीन वर्षाच्या पर्वावर गडचिरोलीकडे अवैधरित्या दारू घेवून जात असलेल्या नव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनाला पकडून २५ पेट्या देशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत २० लाख ९ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत पाथरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारूचे ११५ गुन्हे, दारू पिवून गाडी चालविचल्याचे ४२ गुन्हे, वाहतूकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ६२ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमध्ये २५५ आरोपींना अटक करण्यात आली. ठाणेदार जावेद शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गेवरा कृषी उत्पन्न बाजार समिती नाक्याजवळ टाटा स्टाॅर्म वाहनास पकडण्यात आले. या वाहनात २५ पेट्या देशी दारू, १८ नग इंम्पेरियल ब्ल्यू कंपनीची दारू अशी ५ लाख ९ हजार दोनशे रूपयांची दारू आढळून आली. या वाहनाचा चालक हरीश रमेश दळने (२५) रा. अजनी तालुका रामटेक याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पाथरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पाथरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार जावेद शेख यांच्या नेतृत्वात प्रविण पेंदोर, विजय ढपकस, सुरेंद्र काकडे, नारायण येग्गेवार, निलेश ढोक, अभिषेक राउत, रूपेश सावे, राजु केवट यांनी केली. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-07


Related Photos