जिमलगट्टा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांनी केली तपासणी


- पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराजआत्राम, आत्राम यांचा पुढाकार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
तालुका मुख्यालयापासून ४० कीलोमीटर  अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील जिमलगट्टा येथे आदिवासी विकास  व वने राज्यमंत्री  तथा गडचिरोली  जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  राजे अम्ब्रीशराव महाराज  आत्राम यांच्या   पुढाकारातून तसेच आमदार रामदास  आंबटकर यांच्या सहकार्याने मोफत भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   या शिबीरात जिमलगट्टा परिसरातील महिला,पुरुष व युवकांनी मोठ्या प्रमाणात येवून आपल्या डोळ्याची तपासणी केली.
या शिबीराचा लाभ एकुण ८४०  लोकांनी घेतला. त्यात दोनशेच्या वर रुग्णांची शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. तर चारशेहुन अधिक  लोकांना पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्याकडून  मोफत चष्मे वाटप केल्या जाणार आहे. तसेच शस्त्रक्रियेला येणारा संपूर्ण खर्च पालकमंत्री ना. आत्राम हेच करणार असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री यांनी दिली. नेत्रतज्ञ डाॅ.उत्तम कुमार व त्यांच्या  दहा डाॅक्टरांचे चमुने या शिबीरात आलेल्या लोकांची नेत्र तपासणी केली. आदिवासी व दुर्गम भागात पालकमंत्री ना. आत्राम  यांनी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून आदिवासी लोकांना त्याचा लाभ मिळवून दिल्याने या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.    यावेळी अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री , आदिवासी आघाडी ता.महामंत्री गुडडू  सलामे , शक्तीकेद्र प्रमुख सुनील  रापर्तिवार जिम्मलगट्टा  , अनु.जाती मोर्चा ता.अध्यक्ष सचिन करमे , अनु.जाती मोर्चा ता.महिला उपाध्यक्ष शंकरम्मा गोमासे , संदीप चंदावार,सुधाकर मुंजम ,पुनम निष्टुरी, संन्नी सलामे, नरेश मद्देरलावार, सुकुमार रापर्तिवार  आदींनी  शिबीरासाठी सहकार्य केले. एकल अभियान संच जिम्मलगट्टा  यांच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-07


Related Photos