लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची विविध १७ समित्यांची घोषणा


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विविध १७ समित्यांची रविवारी घोषणा केली. यात जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत जाहीरनामा समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
प्रचार समितीच्या प्रमुखपदी अर्थमंत्री अरुण जेटली आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल या दोन्ही समित्यांमध्ये आहेत. याखेरीज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे जाहीरनामा समितीमध्ये आहेत. जेटली हेदेखील जाहीरनामा समितीमध्ये आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सामाजिक व स्वयंसेवी संघटनांशी संपर्क ठेवण्याच्या समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे. प्रचारासाठी साहित्य निर्माण करणाऱ्या समितीचे प्रमुखपद सुषमा स्वराज यांच्याकडे आहे. या समितीमध्ये विनय सहस्रबुद्धे यांचा समावेश आहे. रविशंकर प्रसाद माध्यम समितीचे प्रमुख आहेत, तर विचारवंतांशी संवाद साधून त्यांचे मेळावे घेण्याची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे आहे. समाजमाध्यम समितीचे प्रमुखपद शाम जाजू यांच्याकडे आहे.  Print


News - World | Posted : 2019-01-07


Related Photos