हमीभाव, अनुदानच शेतकऱ्यांना तारेल : विजय जावंधिया


- मराठी पत्रकारदिनी चौथा स्तंभ पुरस्कार वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ वर्धा :
कितीही प्रकल्प राबविले तरी ६० टक्के शेती कोरडवाहूच राहणार आहे. परिणामी कोरडवाहू शेती नफ्याची केल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. बाजार आणि मान्सून हे शेतकऱ्यांचे दोन शत्रु आहेत. शेतमालाला योग्य हमीभाव आणि अनुदान मिळाल्याशिवाय आपण शेती आणि शेतकऱ्यांचा विकास साधू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.
वर्धा श्रमीक पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन व चौथा स्तंभ पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन आज ६ जानेवारी रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस, आ.डाॅ. पंकज भोयर, महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र  अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांना मान्यवरांच्या हस्ते चौथा स्तंभ पुरस्कार देवूनसन्मानित करण्यात आले. पाच हजारांचा धनादेश, मानचिन्ह, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

   Print


News - Wardha | Posted : 2019-01-06


Related Photos