अंधश्रद्धेचा कळस, आईची निर्घृण हत्या करत प्यायला रक्त


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगडमध्ये  कोरबा जिल्ह्यात एका युवकाने अंधश्रद्धेपोटी आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या करत तिचे रक्त पिल्याची घटना उघडकीस आली आहे. दिलीप यादव असे आरोपीचे नाव आहे. 
मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेत  दिलीप यादवने  आईची हत्या करून रक्त प्यायल्यानंतर   तिच्या शरीराचे तुकडे केले आणि जाळून टाकले. घटना घडल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप यादव हा तंत्र-मंत्र करत होता. नेहमी नरबळी देण्याच्या गोष्टी करत असे. तो आपल्या आईला चेटकीण समजत असे. वडील आणि भावाच्या मृत्यूसाठी तो आईला जबाबदार समजत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधश्रद्धेच्या अतिआहारी गेल्यामुळे काळी जादू आणि अखेर तो खूनी बनला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-01-06


Related Photos