एसबीआयच्या नावे खोटे एमएसएम, नागरिकांनी बळी पडू नये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
विविध माध्यमातून ऑनलाईन नागरिकांना फसविण्याचे उपद्व्याप सायबर चोरटे करीतच असतात. आता   नागरिकांना फसविण्यासाठी त्यांना एसबीआयच्या नावे खोटे एमएसएम केले जात आहेत. या एसएमएसमध्ये एक लिंक दिली असून एसबीआयच्या नावे चक्क खोटी वेबसाइट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकारच्या एसएमएसला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
गेल्या काही दिवसांपासून डेबिट कार्डधारकांना एक एसएमएस पाठविला जात आहे. 'आमच्याकडील दस्तऐवज आणि माहितीनुसार तुम्ही तुमचे एसबीआयचे कार्ड आमच्या वेबसाइटशी लिंक केलेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या कार्डाची लिंकवर अधिकृत नोंदणी करून घ्यावी,' असे या एसएमएसमध्ये नमूद केलेले असते. http://bit.ly/1V8wNAQ ही लिंक या एसएमएसद्वारे पाठविली जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यास 'एसबीआय कार्ड्स' या नावाने तयार केलेली एक खोटी वेबसाइट उघडली जात आहे. ही वेबसाइट एसबीआय कार्डच्या मूळ वेबसाइटसारखीच दिसत असल्याने ग्राहकांचा त्यावर विश्वास बसतो. परंतु, या लिंकद्वारे उघडण्यात येणारी वेबसाइट बोगस असून त्यावर माहिती टाकल्यास ग्राहकाची सगळी माहिती त्याच्या फसवणुकीसाठी वापरली जाते. अद्याप नागपुरात या प्रकारचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु, नागरिकांनी या प्रकारच्या एसएमएसला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-06


Related Photos