महत्वाच्या बातम्या

 अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणारा आरोपी अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात १७ एप्रिल २०२३ ला पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन बुट्टीबोरी हद्दीतील सावंगी ते वर्धा रोडने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सावंगी ते वर्धा रोड येथून एक इसम आपल्या ताब्यातील चारचाकी वाहनात अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची वाहतुक करीत आहे. 

अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सावंगी ते वर्धा रोड येथे नाकाबंदी केली असता एम. एच. ३२ / ए. एस. - ५९८५ क्रमांकाची एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार येताना दिसली. सदर कारला थांबवुन पाहणी केली असता आरोपी आकाश उर्फ छगन अजय मोटघरे (२४) रा. रामनगर जि. वर्धा याने अवैधरित्या १) ऑफिसर चॉईस कंपनीच्या ०६ पेटया ज्यामध्ये प्रत्येकी १८० एम. एल प्रमाणे विदेशी दारूच्या २८८ निया किमती अंदाजे ५७ हजार ६०० रु. २) टंगो कंपनीच्या देशी दारूच्या ०४ पेटया ज्यामध्ये ९० एम. एल. देशी दारूच्या ४०० निया किंमती अंदाजे २० हजार रु. ३) दुबर्ग कंपनीच्या बिअरच्या ०२ पेटया ज्यामध्ये ६५० एम. एल. च्या २४ बिअर किमती अंदाजे ४ हजार ८०० रु. चा मुद्देमाल वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातुन ४) एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्र. एम. एच.-३२ / ए. एस.-५९८५ किंमती अंदाजे ७ लाख रु. असा एकुण वाहनासह ७ लाख ८२ हजार ४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे आरोपीविरुध्द कलम ६५ (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीला जप्त मुद्देमाल व कागदपत्रासह पुढील कायदेशीर प्रक्रीयेसाठी पोलीस स्टेशन बुटीबोरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, महेश जाधव, पोलीस नायक मयुर ढेकळे, अमृत किनगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos