तिनही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी करणार उद्यापासून संप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /आष्टी : शासनाच्या चारही वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात व राज्याच्या उर्जा उद्योगाच्या धोरणा संदर्भात प्रमुख कामगार संघटना म्हणून शासन व व्यवस्थापनाकडे मागील दोन वर्षांपासून पाठपुरवा करण्यात येत होता. यावर उर्जा मंत्री व व्यवस्थापनासोबत योग्य वाटाघाटीसुध्दा झाल्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे उद्या ७ जानेवारीपासून ९ जानेवारीपर्यंत ७२ तासांचा संप पुकारण्यात येणार आहे.
महावितरण कंपनीतील प्रस्तावीत पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून अंमलात आणावी, महापारेषण कंपनीतील स्टाॅफ सेटअप लागू करीत असताना आधीची एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावे, शासन व व्यवस्थापनाकडून महावितरण कंपनीत राबविण्यात येत असलेले खाजगीकरण, फ्रॅन्चाईजीकरण थांबवावे, मुद्रा, शिळ, कळवा आणि मालेगाव चे विभाग खासगी भांडवलदार कंपनीला देण्याची प्रक्रिया थांबवावी, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मित संघाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे, तिनही कंपनीतील रिक्त पदे भरण्यात यावी, बदली धोरण संघटनेसोबत चर्चा करून ठरविण्यात यावे, कंत्राटी व आउटसोर्सींग कंपन्यांतील सर्व कर्मचाऱ्यांकरिता मान्य केलेली जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, समान काम व समान वेतन बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंमलात आणावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-01-06