भामरागड तालुक्यात रास्तभाव दुकानांमार्फत पोषणत्व गुणसंवर्धीत तांदूळ वितरणास प्रारंभ


- पुरवठा निरीक्षक भंडरवाड यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या काल ४ जानेवारी रोजी आयोजित आढावा बैठकीतील निर्देशाप्रमाणे आज ५ जानेवारी रोजी पुरवठा विभागाच्या वतीने भामरागड तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांची सभा  घेण्यात आली. या सभेमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ऍनिमिया मुक्त भारत व सही पोषण देश रोशन या अभियानांतर्गत भामरागड व कुरखेडा तालुक्यात पोषणत्व गुणसंर्धीत तांदूळ पाठविण्यात आले आहे. भामरागड तालुक्यात या तांदळाचे वितरण करण्यास प्रारंभ करण्यात आले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक भंडरवाड यांनी दिली.
पोषणत्व गुणसंवर्धीत तांदळाची माहिती जनसामान्यांत पोहचविण्याकरीता पोस्टर्स दुकानाच्या दर्शनी भागात लावण्याचे व त्या प्रकारची माहिती सर्व गावात दवंडीद्वारे देण्याच्या सुचना देण्यात आल्या. ज्या शिधापत्रिका एनपीएच मध्ये असून उत्पन्न ४४ हजार ग्रामीण व ६९ हजार पेक्षा शहरी भागात  कमी असेल त्यांनी रास्तभाव दुकानदाराकडे देण्यात आलेले हमीपत्र भरून सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकासहीत आठ दिवसात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करावे. जेणेकरून त्यांना प्राधान्य कुटूंब लाभार्थी म्हणून समाविष्ट करून धान्य देण्यात येईल. तसेच लाभार्थी सत्यापणाचे काम वेगाने होण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात दोन मशिन लावण्यात आल्या असून तालुक्यातील सर्व जनतेने कार्यालयात येवून सत्यापन करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा निरीक्षक ए.टी. भंडरवाड यांनी केले. यावेळी रास्तभा दुकानदार, पिओएस मशिन ऑपरेटर सदन गोविंदालवार उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-05


Related Photos