आत्मसमर्पीत जहाल नक्षल्यांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग


- गडचिरोली पोलिस दलाची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक   महेंद्र पंडित , अपर पोलीस अधीक्षक  डाॅ. हरी बालाजी   आणि   अपर पोलीस  डाॅ. मोहित गर्ग   यांच्यासमोर आज ५ जानेवारी रोजी सात जहाल नक्षल्यांनी  आत्मसमर्पण  केले आहे.  या जहाल नक्षल्यांचा अनेक नक्षली कारवायांमध्ये समावेश होता. नक्षल्यांवर शासनाने ३१ लाख ५० हजारांचे बक्षिस जाहिर केले होते.
 विकास उर्फ साधु पोदाळी   (२७)  हा  फेब्रुवारी २०१३ मध्ये बिनागुंडा गाव सिएनएम  टिम मध्ये सामील होवुन माहे मार्च २०१४ पासुन कोडेलयेर छत्तीसगड जन मिलिशिया दलम मध्ये सदस्य  म्हणुन कार्यरत होता. त्याचेवर ०३ चकमकीचे गुन्हे दाखल असुन शासनाने त्याचेवर ४ लाख  रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
वैशाली बाबुराव वेलादी १८ वर्ष वयाची माओवादी  जानेवारी २०१५ मध्ये राही दलम मध्ये सदस्या  म्हणुन भरती होवुन   जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये चातगाव दलम मध्ये राहून  पुन्हा राही दलम मध्ये गेली . त्यांनतर   ऑगस्ट २०१८ मध्ये भामरागड दलम मध्ये कार्यरत होती. तिच्यावर शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. 
 सुरज उर्फ आकाष उर्फ धनावू तानु हुर्रा हा २५ वर्ष वयाचा माओवादी माहे. फेब्रुवारी २०१० मध्ये टिपागड  दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून त्यांनतर एप्रील २०११ ते एप्रील २०१३ कालावधीत धानोरा दलम मध्ये  आणि माहे मे २०१३ मध्ये पुन्हा टिपागड दलम मध्ये काम करुन सन २०१५ मध्ये सदस्य पदावरुन त्याला  पिपीसीएम म्हणुन पदोन्नती देण्यात आली.   जानेवारी २०१७ पर्यंत कसनसुर एक्शन टिम मध्ये कार्यरत  होता. तसेच   फेबु्रवारी २०१७ ला कसनसुर एक्शन टिम मधुन बदलुन   ऑगस्ट २०१७ पर्यंत  कसनसुर दलम मध्ये पिपीसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १३ चकमकीचे, ०५ खुनाचे, ३ भूसुरूंग  स्फोट, १  जाळपोळ असे गुन्हे दाखल असुन त्याच्यावर शासनाने ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस  जाहीर केले होते.
  मोहन उर्फ दुलसा केसा कोवसी हा १९ वर्ष वयाचा माओवादी माहे.  जुन २०१५ ला पेरमीली दलम मध्ये  भरती होवुन   जुलै २०१५ पर्यंत पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत असतांना   ऑगस्ट २०१५ ला पेरमिली दलम मधुन सिरोंचा दलम मध्ये बदली होवुन   फेबु्रवारी २०१७ पर्यंत सिरोंचा दलम डिव्हीसी  रघु याचा गार्ड म्हणुन कार्यरत होता. माहे   २०१७ डिव्हीसी रघुची सिरोंचा दलम मधुन भामरागड/गट्टा  एरियात बदली झाल्याने रघु सोबत गार्ड म्हणुन   एप्रिल २०१७ पर्यंत भामरागड दलममध्ये सदस्य पदावर  कार्यरत होता. त्याच्यावर ०२ चकमकीचे गुन्हे, ०१ खुनाचा गुन्हा दाखल असुन त्याच्यावर शासनाने  ४ लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
  नविन उर्फ अशोक पेका हा २५ वर्ष वयाचा माओवादी माहे. फेबु्रवारी २०१२ मध्ये गट्टा दलममध्ये भरती  होवुन   मार्च २०१२ पर्यंत गट्टा दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत राहुत   एप्रिल २०१२ मध्ये गट्टा दलम  मधुन सिरोंचा दलममध्ये बदली होवुन सन २०१४ पर्यंत सिरोंचा दलममध्ये कार्यरत राहुन डिव्हीसी श्रीनु  कसनसुर  चकमकीत मयत  अंगरक्षक म्हणुन कार्यरत होता. सन २०१४ मध्ये सिरोंचा दलममधुन गट्टा  दलममध्ये बदली होवुन सन २०१५ मध्ये उपकमांडर पदावर पदोन्नती होवुन सन २०१७ पर्यंत गट्टा दलम  उपकमांडर पदावर कार्यरत होता.   फेबु्रवारी २०१७ मध्ये गट्टा दलममधुन पेरमीली दलमध्ये बदली होवुन  मार्च २०१७ पर्यंत पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता.   एप्रिल २०१७ मध्ये पेरमिली   दलममधुन पुन्हा गट्टा दलममध्ये बदली होवुन माहे ऑगस्ट २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता.  त्याच्यावर ५ चकमक, २ हमला, १ ब्लाॅस्ट, ६ खुन, १ अपहरण , १ हमला, २ जाळपोळ , असे  गुन्हे दाखल असुन त्याच्यावर  शासनाने ४  लाख ५० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
 जन्नी उर्फ कविता हेवडा धुर्वा, ही २६ वर्ष वयाची माओवादी माहे.  जुन २०१० ला भामरागड दलममध्ये  भरती होवुन आठ ते दहा दिवस राहुन माहे जुन २०१९ पर्यंतंच भामरागड दलमध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.   जुन २०१० ला भामरागड दलममधुन पेरमिली दलममध्ये बदली होवुन   डिसेंबर २०१० पर्यंत पेरमिली दलममध्यये सदस्य पदावर कार्यरत होती.    डिसेंबर २०१० ला पेरमिली दलममधुन कंपनी क्रमांक  ४ मध्ये बदली होवुन पिपिसिएम पदावर कार्यरत राहुन याच दरम्यान पिपिसिएम पदावर कार्यरत राहुन  पिपिसिएम पदावर पदोन्नती होवुन माहे डिसेंबर पर्यंत कंपनी क्रमांक ४ प्लाटुन क्र. ए सेक्शन उपकमांडर पदावर कार्यरत होती. तिच्यावर ७ चकमकीचे, २ जाळपोळीचे, ३ खुनाचे, १ भूसुरूंग स्फोट असे गुन्हे  दाखल असुन तिच्यावर शासनाने ५ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
रत्तो उर्फ जनीला उर्फ दुर्गी गेबा पुंगाटी, ही २९ वर्ष वयाची माओवादी माहे ऑक्टोबर २००७ ला भामरागड  दलममध्ये सदस्यापदावर भरती होती. माहे ऑगस्ट २०१० ला कंपनी क्र १० ओपन केल्यावर कंपनी क्र १० मध्ये बदली होवुन सन २०१३ ला पदोन्नती होवुन नोव्हेंबर २०१७ पर्यंत पिपिसीएम पदावर कार्यरत होती. डिसेंबर २०१७ ला ती बीमार असुन तीला गट्टा दलममध्ये अपचाराकरीता सोडण्यात आले व त्यानंतर कंपनी  १०  मधुन टिपागड दलममध्ये पाठविण्यात आले व बदली करण्यात आले.   फेबु्रवारी २०१८ ला गट्टा  दलममधुन टिपागड दलमध्ये   डिसेंबर २०१८ पर्यंत एसिएएम पदावर कार्यरत असतांना ६ डिसेंबर २०१८ ला तिम्मन जवेली डे-यावरून दलम सोडुन जन्नी धुर्वा सोबत पोमके कोठी येथे येवुन    आत्मसमर्पण केले. तिच्यावर शासनाने  ५ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.   
आत्मसमर्पीतांचे पुनर्वसन घडवुन आणल्याने मोठया प्रमाणावर माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे.  विकास कामांना रोखणाऱ्या  माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर  असुन जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात  आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत  करेल, असे आवाहन  पोलीस अधिक्षक गडचिरोली  शैलेश बलकवडे   यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-05


Related Photos