महत्वाच्या बातम्या

 जत्रा शासकीय योजनांची अभियानांतर्गत प्रशासन आपल्या दारी नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : विविध शासकीय योजनांची माहिती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वदूर नागरिकांना व्हावी. त्यासोबतच विविध योजनांची अर्ज सादर करता यावे, यासाठी प्रशासनातर्फे जत्रा शासकीय योजनांची अभियान दोन महिने राबविण्यात येणार असून जिल्ह्यात सर्व मंडळस्तरावरील शाळेत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीय योजनांचा अर्ज आपल्या गावातच शिबीरात भरता येईल, या शिबीराचा नागरिक, शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जत्रा शासकीय योजनांची अभियानांतर्गत पूर्व आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुखांसोबतच जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते. दूरदुष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जत्रा शासकीय योजनांची अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शिबीरासाठी सर्व अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असून आपले सेवा केंद्रात महाडिबीटीद्वारे नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहेत. नागरिकांनी योजनेच्या संबंधीत सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. 

या शिबीरात समाज कल्याण, आरोग्य, कृषी विभाग व इतर विभागाच्या योजनासह इतर विभागाच्या योजनांचाही लाभ मिळणार आहे. आदिवासी उमेदवारांनाही यावेळी जात प्रमाणपत्र विनाशुल्क मिळणार आहेत. शिबीराचे आयोजन मंडळस्तरावरील खाजगी किंवा शासकीय शाळेत होणार आहे. हे अभियान १५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व अर्ज शिबीरात ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिले. तसेच दररोज किती अर्ज प्राप्त झाले याचे नियमित अपडेट ठेवा. त्यासोबत या शिबीरात लोकप्रतिनीधीना आमंत्रित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिले.

उन्हाळा पाहता या जत्रेतील कार्यक्रम शक्यतो सकाळच्या वेळेत ठेवावे व कार्यक्रम स्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अश्या सूचना विभागांना देण्यात आले.





  Print






News - Bhandara




Related Photos