महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : चोरी गेलेली दारू स्थानिक गुन्हे शाखेने केली जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : मूल तालुक्यातील भेजगाव येथील अखिल गांगरेड्डीवार यांच्या मालकीच्या दारू भट्टी व बिअर शॉपी मधून १७ एप्रिलला बिअरच्या २१ पेट्या व देशी दारूची १ पेटी व रोख रुपये असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला होता. 

सदर चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला असता गोपनीय माहितीद्वारे चंद्रपूर बंगाली कॅम्प भागातील राजीव गांधी नगर येथे राहणारे राकेश महतो यांच्या घरी चोरी गेलेला दारूचा मुद्देमाल लपवून ठेवला आहे, अशा माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महतो यांच्या घरी धाड माटाकली. त्यावेळी पोलिसांना बघून राकेश महतो ने पळ काढला.

सदर राकेशच्या पत्नीने याबाबत पोलिसांना माहिती दिली की, राकेश महतो, विक्की महतो व एका इसमाने ते दारूचे बॉक्स घरी लपवून ठेवले. चोरीची दारू राकेश ने बाथरूम मध्ये लपवून ठेवली होती. पोलिसांनी बिअर चे १८ बॉक्स असा तब्बल ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, मिलिंद जांभुळे, सतीश बगमारे, अपर्णा मानकर व दिनेश उराडे यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos