बेबी मडावी च्या हत्येच्या निषेधार्थ महिला, शालेय विद्यार्थिनींनी हुंकार रॅली काढून केला नक्षल्यांचा निषेध


- भामगरागड तालुक्यातील बेबी मडावी हिच्या हत्येबद्दल व्यक्त केला रोष
- पोलिस अधीक्षकांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भामरागड तालुक्यातील इरपनार येथील इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी बेबी मडावी हिची  नक्षल्यांनी २८ सप्टेंबर २०१८ अपहरण करून ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हत्या केली होती. या हत्येच्या निषेधार्थ दुर्गम व अतिदुर्गम भागातील महिला व शालेय विद्यार्थ्यांनी  हुंकार रॅली काढून नक्षल्यांचा निषेध केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
बेबी मडावी ही आपल्या कुटुंबीयांसोबत अत्यंत आनंदाने राहत होती. मात्र २८ सप्टेंबर रोजी नक्षल्यांनी बंदुकीच्या धाकावर तिला घरून घेवून गेले. यानंतर तिला पाच दिवस सतत आपल्यासोबत ५ ऑक्टोबर पर्यंत  फिरवून अत्याचार केला. यानंतर ६ ऑक्टोबर  रोजी तिची हत्या केली. तिचे प्रेत गोंगवाडाकडे जाणार्या टी पाॅईंटजवळ टाकून देण्यात आले होते. 
या घटनेच्या निषेधार्थ ५८ ठिकाणी महिला व महाविद्यालयीन युवतींनी हुकार रॅली काढली. यामध्ये जिल्ह्यातील अंदाजे २० ते २५ हजार महिला सहभागी झाल्या होत्या. या रॅलीदरम्यान नक्षल्यांनी बेबी मडावी हिची हत्या केल्याचा निषेध करण्यात आला. अल्पवयीन मुली, दुर्गम भागातील आदिवासी समाजावर अत्याचार होत असून नक्षल्यांनी अत्याचार थांबवावे, दलम मधील महिला नक्षल्यांचा निषेध करीत महिलांना जगण्याचा अधिकार असल्याचा हुंकार देत नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. बेबी मडावी हिला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-05


Related Photos