सात जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण


- ३१ लाख ५० हजारांचे होते बक्षिस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
हिंसाचारी वृत्तीला कंटाळलेल्या व शासनाने ३१ लाख ५० हजारांचे बक्षिस जाहिर केलेल्या सात जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्म्समर्पण केले असल्याची माहिती पोलिस विभागाने पत्रकार परिषदेतून दिली आहे. 
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, डाॅ. हरी बालाजी, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांच्यासमोर या नक्षल्यांनी आत्ममर्पण केले आहे. गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच विकासाच्या विविध योजना राबवून विश्वास संपादन केल्यामुळे नक्षली आत्मामर्पण करीत असल्याचे पोलिस विभागाने म्हटले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये विकास उर्फ साधु पोदाळी, वैशाली बाबुराव वेलादी सुरज उर्फ आकाश धनातू तानु हुर्रा, मोहन उर्फ दुलसा केसा कोवसा, नविन उर्फ अशोक पेका, जन्नी उर्फ कविता हेवडा धुर्वा व रत्तो उर्फ दुर्गी  गेब्बा पुंगाटी यांचा समावेश आहे. या नक्षल्यांचा मोठमोठ्या नक्षल कारवायांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-05


Related Photos